भूकंपाने हादरला कोयना धरण परिसर, नागरिकांमध्ये प्रचंड भीती

0

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

साताऱ्यातील कोयना धरण परिसर तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे.  यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.

रविवारी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. सुदैवानं घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

रविवारी कोयना धरण परिसरातात जाणवलेला धक्का सौम्य होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 एवढी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता अशी माहिती आहे. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नाही अशी माहिती धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

भूकंप का होतो?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि डिस्टर्बन्स झाल्यानंतर भूकंप होतो.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.