ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीवर बनणार चित्रपट !

0

मुंबई – फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळकेंपासून सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसून बंगाली चित्रपटांना जगभर जितका मान आहे तितका मराठीला नाही. तशी कामगिरी कोणीतरी करावी, अशी अपेक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. ‘कोसला’ या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते.

चित्रपटाच्या घोषणेच्या कार्यक्रमाला नेमाडे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, निर्माते मेहुल शाह, दिग्दर्शक आदित्य राठी, गायत्री पाटील, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. नेमाडे म्हणाले की, मीसुद्धा ‘कोसला’मधील ९९ लोकांपैकीच एक आहे. मला शंभरातला एक नेहमी नको असतो. ९९ हा आकडा
पाहिला तर तो सारखासारखा पुढे जाणारा आहे. त्यामुळे ९९ आकडा कादंबरीत वापरला.

Leave A Reply

Your email address will not be published.