आधार अपडेट केलं नसेल तर लगेच करा, ‘या’ तारखेपर्यंत मुदत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया ने आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची करण्याची अंतिम मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली होती. १४ डिसेंबरपर्यंत आधार अपडेट फ्री करता येणार आहे. UIDAI ने ६ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, १५ सप्टेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

माय आधार पोर्टलद्वारे तुम्ही आधार अपडेट करू शकता
https://myaadhaar.uidai.gov.in/ वर My Aadhaar पोर्टलद्वारे फ्री आधार कार्ड तपशील अपडेट करण्याची सुविधा डिसेंबरमध्ये १४ तारखेपर्यंत मोफत सुरु राहील. UIDAI 10 वर्षांपेक्षा जुन्या आधार धारकांना नवीन माहितीसह तपशील अपडेट करण्याचे आवाहन करत होते.

UIDAI वेबसाईटवर, डेमोग्राफिक माहितीची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी कृपया आधार अपडेट करा. ते अपडेट करण्यासाठी, तुमचा ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा अपलोड करा. असे सांगण्यात आले आहे.

मोफत अपडेट सुविधा https://myaadhaar.uidai.gov.in वर ऑनलाईन उपलब्ध आहे तर CSC वर फिजिकल अपडेटसाठी पूर्वीप्रमाणे २५ रुपये शुल्क आकारले जाईल.

आधारमध्ये पत्ता मोफत कसा अपडेट करायचा?

स्टेप 1:https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा

स्टेप 2: लॉगिन करा आणि ‘अपडेट नाव/लिंग/जन्म आणि पत्त्याची अपजडेट’ वर क्लिक करा/निवडा

स्टेप 3: ‘आधार ऑनलाइन अपडेट करा’ वर क्लिक करा

स्टेप 4: डेमोग्राफिक पर्यायांच्या सूचीमधून ‘पत्ता’ निवडा; आणि ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा

स्टेप 5: स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि आवश्यक डेमोग्राफिक माहितीसाठी एंटर करा.

स्टेप 6: रु.25 भरा. (14 डिसेंबरपर्यंत आवश्यक नाही).

स्टेप 7: सेवा विनंती क्रमांक (SRN) जनरेट केला जाईल. ते नंतर ट्रॅकिंग स्थितीसाठी जतन करा. अंतर्गत गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक SMS प्राप्त होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.