ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाने एके ४७ रायफलमधून गोळी झाडून घेत जीवन संपविले

0

रांची ;- ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाने एके ४७ रायफलमधून गोळी झाडून घेत जीवनसंपविल्याची घटना उघडकीस आली असून सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेला हा जवान हिमाचल प्रदेशचा होता. तो झारखंडमध्ये ड्युटीवर असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . मात्र आत्महत्या का केली हे समजू शकले नाही .

जवानाचे संजय कुमार असे नाव असून तो २१८ बटालियन सिलममध्ये गार्ड रूम म्हणून सध्या ड्युटीवर होता. संजय कुमार १५ दिवसांची सुट्टी संपवून २१ नोव्हेंबरला पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. त्यानंतर चारच दिवसात सोमवारी त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. संजय गार्ड रूममध्ये ड्युटीवर होता. यावेळी त्याने एके ४७ मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कँपमध्ये गोळीबाराच्या आवाजाने गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच एसपींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास करण्यात आला. जवानाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.