कोल्हापुरात वातावरण तापले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू संघटना आक्रमक

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापले आहे. औरंगजेबाचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) ३५० व्या राज्याभिषेकाच्या दिवशी काही तरुणांकडून स्टेटसवर ठेवण्यात आला होता. ज्यामुळे संपूर्ण शहर आज बंद ठेवण्यात आल आहे. काही तरुणांनी औरंगजेबाचे आक्षेपार्ह फोटो स्टेटसला ठेवले होते. यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. आणि कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या तरुणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी काळ ठिय्या आंदोलन केले होते.

आंदोलनानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले होते. पोलिसांनी जमावाला पांगवले होते, तरी मंगळवारी रात्री पर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते. मात्र आज संपूर्ण कोल्हापूर बंद ठेवण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आहेत. तसेच याविरोधात आंदोलन केले जात आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिलांचा समावेश आहे. तर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.