जळगावात तरुणाचा मित्रांनीच केला खून ; तीन जणांना अटक

0

जळगाव ;- शहरातील खोटे नगर परिसरात कुरुंबा येथील ३५ वर्षीय तरुणावर त्यांच्याच मित्रांमध्ये वाद झाल्याने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री खोटेनगर परिसरात साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे ( वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.

खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्रासोबत आल्यानंतर संशयितदेखील आले. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर शाब्दीक वाद वाढत गेल्याने दीपकसह अन्य दोघांनी धारदार शस्त्र भोसकल्याने अविनाश हा गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

तिघांना तालुका पोलिसांकडून अटक

अविनाश अहिरे या तरुणाच्या खून प्रकरणी महेश पोपट सोनवणे (चंदूअण्णा नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित दीपक प्रकाश पाटील, साहिल खान, अमोल गवळी (पिंप्राळा, जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात भादंवि 307 लावण्यात आले असलेतरी नंतर तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यात 302 कलम वाढवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड
व तुषार जोशी यांनी तिघा आरोपींना अटक केली.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.