अर्धा टन कोकेनची तस्करी करणाऱ्या भारतीय जोडप्याला अटक

0

लंडन – ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या जोडप्याला ऑस्ट्रेलियात अर्ध्या टनापेक्षा जास्त कोकेन तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारताने या जोडप्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
भारतीय वंशाचे एक विवाहित ब्रिटीश जोडपे, आरती धीर, 59, आणि कवलजीतसिंह रायजादा, 35, यांना अंमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवाईचे नेतृत्व आणि युनायटेड किंगडममधून ऑस्ट्रेलियाला अर्ध्या टनापेक्षा जास्त कोकेनची निर्यात केल्याबद्दल दोषी आढळले.

यूकेच्या नॅशनल क्राईम एजन्सीने (एनसीए) या बेकायदेशीर कारवाईचा पर्दाफाश केला.

 

या जाेडगोळीने लोखंडी टूलबॉक्सच्या अवरणाखाली कोकेन लपवून विमानाने पाठवली होती. ऑस्ट्रेलियन सीमा दलाने मे २०२१ मध्ये सिडनी येथे ५७ दशलक्ष पौंड किमतीचे कोकेन पकडल्यानंतर, हॅनवेल येथील आरती धीर (५९) आणि कवलजीतसिंह रायजादा (३५) राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेच्या (एनसीए) रडारवर आले. साउथवॉर्क क्राउन कोर्टात सोमवारी झालेल्या खटल्यानंतर ज्युरीने त्यांना अंमली पदार्थांच्या १२ आणि मनी लाँड्रिंगच्या १८ प्रकरणांत दोषी ठरवले.

ऑस्ट्रेलियामध्ये कोकेनच्या किमती युनायटेड किंगडमपेक्षा जास्त आहेत, ज्यामुळे धीर आणि रायजादा यांच्यासाठी बेकायदेशीर शिपमेंट अधिक फायदेशीर ठरते.

Leave A Reply

Your email address will not be published.