चीनला सापडला तेलाचा मोठा खजिना !

0

बीजिंग ;- चायना जिओलॉजिकल सर्व्हेने आणि चीनी मीडियानुसार, हेनान प्रांतातील सॅनमेन्क्सिया बेसिनमध्ये ड्रिलिंग करण्यात आले, त्यादरम्यान तिथे हे तेलाचे मोठे साठे सापडले आहेत. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

तेल खरेदीवर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने चीनने देशातील विविध ठिकाणी तेलसाठ्यांचा शोध सुरू केला होता. चीन सरकारचे मुखपत्र सीसीटीव्हीने म्हटले आहे की, ‘गेल्या 50 वर्षांपासून या भागात तेल आणि नैसर्गिक वायुंचा शोध सुरू होता. आता हे तेलाच्या साठ्यांचा शोध मैलाचा दगड ठरणार आहे.’

चीन मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचे उत्पादन करतो, परंतु देशात नैसर्गिक संसाधनांची मागणी खूप जास्त आहे. चीन आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 70% पेक्षा जास्त आयात करतो आणि गेल्या वर्षी त्यांनी 566 मिलियन टन कच्चे तेल आयात केले होते. तर, 2022 मध्ये ही आयात 508 मिलियन टन होती.

पूर्वी चीन सौदी अरेबियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत असे. परंतु आता रशियाने सौदी अरेबियाची जागा घेतली आहे. कस्टम डेटानुसार, गेल्या वर्षी चीनच्या एकूण कच्च्या तेलाच्या खरेदीत रशियाचा वाटा 19% होता, तर सौदीचा वाटा 15% होता. चीनला तेल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. गेल्या वर्षी चीनने आपल्या कच्च्या तेलाच्या वापराच्या 2.5% खरेदी अमेरिकेकडून केली.

Leave A Reply

Your email address will not be published.