क्रूरतेचा कळस ! चिमुकल्यांची हत्या करुन मांस खाल्ले

0

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पाकिस्तानमधून क्रूरतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब प्रांताच्या मुझ्झफरगढ येथे एका व्यक्तीने लहान मुलांची हत्या करुन त्यांचे मांस खाल्ल्याची घटना घडली असून या  घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अमानुष हत्या

तीन लहान मुलांचे मुझ्झफरगढच्या खान गड भागातून अपहरण झाले होते. त्यातील दोन चिमुकल्यांनी अमानुष हत्या करण्यात आली असून त्यांचे मांस खाण्यात आले आहे. सात वर्षीय अली हसन पोलिसांना मिळाला आहे. त्याने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.

मांस दर्गामध्ये वाटले 

अली हसनने सांगितलं की, तीन वर्षीय अबदुल्ला आणि त्याची दीड वर्षाची बहीण हाफसा यांची आरोपीने हत्या केली. त्यानंतर त्यांचे मांस शिजवले आणि ते खाल्ले. इतकेच नाही तर व्यक्तीने मांस मुझ्झफरगढमधील स्थानिक दर्गामध्ये वाटले आहे. पोलिसांना अबदुल्ला याचे अवशेष मिळवले आहेत. तसेच घटनास्थळावरुन एक चाकू मिळाला आहे. हाफसाचा शोध सुरु आहे.

एकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनेमुळे परिसरात संताप असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.