लोकशाही खाऊगल्ली… आजची रेसिपी; वेट लॉस ब्रेकफास्ट…

0

 

लोकशाही विशेष

 

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे आज सर्वंना व्यायाम करून वजन नियंत्रित करण्यासाठी अडचणी येतांना दिसतात. त्यामुळे आज-काल सगळ्यांनाच वेट लॉस रेसिपी हव्या असतात. त्याबरोबर पौष्टिकताही हवी,कारण नुसतं वजन कमी करून उपयोग नाही तर शरीरात तेवढीच एनर्जी ही हवी आहे. त्यामुळे आज आपण पाहूया ही साधीसुधी पारंपारिक अशी वेटलॉस नाश्त्याची रेसिपी.

 

साहित्य…

1 छोटी वाटी मूग डाळ, 1 छोटी वाटी चणाडाळ, 1 छोटी वाटी तांदूळ, 4 काळी मिरी, 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1/2 चमचा जीरे, 1 चमचा धने, 1/4 चमचा ओवा, 10 कढीपत्त्याची पाने, 1/4 चमचा हिंग, 1 समजा शेंगदाण्याचा जाडसर कूट, 1 टेबलस्पून साजूक तूप, 1 सुकी मिरची

 

कृती…

स्टेप 1

प्रथम तांदूळ चना डाळ आणि मूग वेगवेगळे, मंद आचेवर हलके होईपर्यंत कोरडे भाजून घ्यावेत.

स्टेप 2

नंतर त्यामध्येच धने,जिरं,लवंगा, काळी मिरी, दालचिनी आणि एक सुकी मिरची हे टाकून दोन मिनिटं परतून घेऊन थंड करायला ठेवणे. व नंतर मिक्सरला लावून जाडसर भरडा करून घेणे.

स्टेप 3

नंतर कढईत साजूक तूप फोडणीसाठी घेऊन त्यात कढीपत्ता आणि हिंग घालून आपण केलेला भरडा छोटी दीड वाटी घालावा, परतून घ्यावे. त्यानंतर चार वाट्या पाणी घालून गरजेनुसार मीठ, साखर मंद आचेवर पाच मिनिटं झाकून ठेवावे. नंतर त्यात एक चमचा शेंगदाण्याचा कूट, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतून गरमागरम सर्व्ह करावे.

स्टेप 4

वरून एक चमचा साजूक तूप सोडावे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.