चाळीसगाव ;-हातगाडी लावण्यासाठी हप्त्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की स्वामी समर्थ कॉलनी परिसरात राहणारे जगन्नाथ हरिभोई वय 45 यांनी चाळीसगाव शहरात नागद रोडच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक जागी हातगाडी लावली असता संशयित दानिश असलम शेख राहणार नागद रोड याने येऊन जगन्नाथ भोई यांना एक हजार रुपयांची खंडणी मागून त्यांना व त्यांच्या मेहुण्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दोघांच्या हातगाड्या आडव्या पाडून नुकसान करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 31 जुलै रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी भोई यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित दानिश असलम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.