केसीईच्या ५ प्राध्यापकांची अभ्यास मंडळावर निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे शिक्षण शास्त्र या विभागातील अभ्यासक्रम मंडळावर केसीई सोसायटीच्या शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथील एकूण पाच प्राध्यापकांची निवड झाली. प्रशासन आणि मूल्यमापन विभागात डॉ. शैलजा भंगाळे यांची निवड झाली.शैक्षणिक मानसशास्त्र विभागात प्राचार्य डॉ. अशोक राणे व डॉ. रंजना सोनवणे यांची निवड झाली. तसेच शिक्षणशास्त्र विभागात डॉ. केतन चौधरी आणि डॉ. के व्ही बाविस्कर यांची निवड झाली. महाविद्यालयामार्फत प्रमुख अतिथी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.