केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात “उमंग २०२३” उत्साहात

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

के सी ई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव येथे दि.०६ ते १५ या दरम्यान “उमंग २०२३”अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यात रांगोळी,मेहंदी ,नेल आर्ट संगीतखुर्ची ,दांडिया,आर्टीफिसिअल बकेट मेकिंग,अंताक्षरी, स्पर्धा तसेच ग्रुप डे,हॉलोवीन डे,ट्रॅडिशनल डे ,चॉकोलेट डे ,इत्यादि दिवस उत्साहात साजरे केले.दि १३ला साडी डे व टाय डे आणि दि.१५ ला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.”उमंग २०२३”साठी सांस्कृतिक समिती प्रमुख लीना आर.वाघुळदे, प्रा राजेश वाघुळदे महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.संजय आर.सुगंधी, प्रा.संजय दहाड महाविद्यालयाच्या डीन डॉ.प्रज्ञा विखार,महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख ,तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

यात विद्यार्थ्यांनी त्यांचे विविध कला गुण प्रदर्शित केले.या कार्यक्रमात दांडिया साठी प्रा.लीना भारंबे (मु .जे.महाविद्यालय )यांनी व ग्रुप डे साठी योगिता लोखंडे(कला शिक्षिका सेंट जोसेफ महाविद्यालय जळगाव ) ट्रॅडिशनल डे साठी परीक्षक म्हणून आय एम आर कॉलेजच्या प्रा शाम सुबोध , आणि प्रा कविता पवार यांनी काम पहिले. साडी डे आणि टाय डे साठी परीक्षक म्हणून डॉ. विजेता सिंग आणि जनसंपर्क अधिकारी संदीप केदार यांनी काम पहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रा राजेश वाघुळदे , अविनाश सूर्यवंशी, प्रा सचिन नाथ तसेच विद्यार्थी सचिव निखिल सुतार , सांस्कृतिक सचिव अनिकेत पाटील, खेळ सचिव मुकेश पाटील आणि मुलींची प्रतिनिधी विशाखा पाटील, निशांत फिरके , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.