इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये परंपरा पोशाख दिवस व रक्तदान शिबीर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
लेक्चर,प्रॅक्टिकल्स, सबमिशन, गेस्ट लेक्चर्स असा रोजचा दिनक्रम असलेल्या के.सी.ई. च्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव चा चेहरा “सिनर्जी २०२३ च्या ट्रॅडिशनल डे” मुळे वेगळाच दिसून आला. डिझाइनर साड्या, फेटे, कुर्ते, अनारकली पॅटर्न, अशा विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे परिसर कलरफुल्ल झाले होते. निमित्त होते ‘ट्रेडिशनल डे’चे.

नानाविध पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात, गार्डनमध्ये फोटोसेशन व सध्या ट्रेंड मध्ये असणारे इन्स्टा रिल केले. आजचे महाविद्यालयाचे चित्र म्हणजे, कॉलेज कॅम्पस नव्हे, तर फोटोसेशनचा कट्टा, असे होते. महाराष्ट्रीयन, बंगाली, साउथ इंडियन, गुजराती, मारवाडी, अशी वेशभूषा केलेल्या युवती, अनारकली पॅटर्न परिधान केलेल्या युवती आणि डिझाइनर घागरा परिधान केलेल्या तरुणींनी महाविद्यालय परिसर रंगीबेरंगी झाला होता,. मुलींप्रमाणेच मुलांचादेखील जलवा पाहायला मिळाला. फेटे, मोदी जॅकट, पठाणी, शेरवाणी, डिझाइनर धोतर, अशा ड्रेसमध्ये मुलं होते. राजस्थानी, गुजराथी, साऊथ इंडियन, बंगाली, कोळी, आग्री, महाराष्ट्रीयन अश्या विविध प्रांताला सादर करत कोणी नृत्य ,डायलॉग बोलून परिधान केलेल्या वेशभूषेला न्याय दिला.

एन्जॉयमेंट सोबत सामाजिक जाणिव ठेवत विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीर व हिमोग्लोबिन तपासणी देखील केले.
त्या प्रसंगी इन्स्टिटयूट मध्ये इन्स्टिट्यूट च्या डिरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा किरण बेंडाळे, रेड क्रॉस ब्लड सेंटरचे चेयरमन डॉ. प्रसन्न रेहदासनी, उपाध्यक्ष गनि मेमन आणि सचिव डॉ. अपर्णा मकासरे. कार्यक्रमा प्रसंगी उपस्तिथ मान्यवरांनी रक्तदाना चे फायदे सर्वाना पटवून दिले व आपण केलेल्या रक्तदान हे पाच विविध प्रकारात विभाजन होऊन कसे पेशन्ट ला उपयोगी ठरते हे सुद्धा डॉ. प्रसन्न रेहदासनी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच डॉ. अपर्णा मकासरे यांनी “ऍनेमिया” या विषयावर प्रेसेंटेशन पर माहिती देऊन विद्यार्थ्यांना ऐनेमिया चे प्रकार, कारण व त्यावर उपचार हे विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत समजावले. विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी हिमोग्लोबिन तपासणी केली, एकूण 50 अधिक विद्यार्थ्यांनी उस्फूतपणे रक्तदान केले.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.