केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये मॅनेजर डे साजरा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

के सी ई चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये मॅनेजर डे उत्साहात साजरा झाला. या कारेक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुभ ढाके उपस्थित होते
या कारेक्रमामागील भुमिका मांडताना प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी कौस्तुभ ढाके यांचे स्वागत केले त्यानंतर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, “तुम्ही भविष्यातील व्यवस्थापक आहात तुम्हाला एनेलीटीकल स्कील हवे, ईव्हाल्युएशन कपॅसिटी हवी, अवेअरनेस हवा. तुम्हाला स्वतःचे महत्त्व अश्याच स्पर्धांमधुन समजते. एखादी टिम पुढे जात असेल तर स्वतःत काय कमी पडते हे समजून घेता आले पाहिजे. फक्त थेअरी वाचुन तुम्हाला मार्क मिळतील पण कार्पोरेट जगातले चौफेर ज्ञान या अश्या इव्हेंट मधुन तुम्हाला मिळते. तुम्ही एका दमात मॅनेजर होणार नाही.. पर्फोर्मन्स दाखवा किंवा पेरिश व्हा .. थांबा.. तुम्ही काम केले नाही तर तुम्ही व्यवस्थेतून बाहेर फेकले जाल. काल काय होतो आज काय आहे उद्या काय व्हायचे ते आताच अँनॅलाईज करा. विजिगीषु वृत्ती हवी.

त्यानंतर बोलताना, प्रमुख पाहुणे “कौस्तुभ ढाके” यांनी सांगितले, “आपल्या स्वतःतला हिरा शोधा. एटेंशन ठेवा, कामाची माहिती ठेवा. बराक ओबामा त्याच्या सेन्स आॅफ ह्युमर चांगला आहे. असे लोक तुमच्या सिलॅबस च्या पलिकडे जाऊन आभ्यासा. स्कील सेट बदलले आहे. इंडस्ट्रीअल एज चा हँग ओव्हर आहे. तो ओळखा. मॅनेजर व्हायचे असेल तर काही वेळा डोके बाहेर ठेवा, हि अशी पध्दत आधी होती. पण आता इन्फर्मेशन एज आहे. मार्क झुकरबेक हा “काॅम्पुटर सोबत इंडस्टीअल सायकाॅलाॅजी शिकला, जी तुमच्या सिलॅबस मध्ये कुठेच नाही. त्यामुळे आपण फार डिपेंडंट झालो आहे. आपण फक्त ब्लेम करायला शिकलो आहे. त्यामुळे आपण अँपाॅर्चुनीटी ग्रॅप करत नाही. त्यासाठी क्रिटिकल थिंकिंग वाढवा. फेस व्हॅल्यु व्यतिरिक्त आणखी काही आहे ते शोधा. डोके वापरा मेजाॅरीटी नेहमीच बरोबर असते असे नाही. आतापर्यंत जे केले तेच पुढे केले तर चालणार नाही. इंडस्ट्रिअल एज ते इन्फॉर्मेशन एज हा फरक लक्षात घेऊन काम करा.
यानंतर क्वीज काँपीटिशन , स्टेटा गेम , केस स्टडी या स्पर्धा संपन झाल्यात. केस स्टडीसाठी परीक्षक म्हणुन प्रा शुभदा कुलकर्णी यांनी काम बघितले. या तिन्ही स्पर्धा मिळुन 52 टिम्सने सहभाग नोंदवला .

बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांनाअभिजीत पाटिल यांनी बोलतांना “विद्यार्थ्यांना चांगल्या आयडिया तुम्ही आज प्रत्यक्षात आणल्यात, स्टेटा गेमच्या स्ट्रॅटेजीक मुव्ह शिकलात त्या तुम्ही आता फिल्डवर जाल तेव्हा प्रत्यक्षात आणालच आणि व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी व्हाल”, असा विश्वास दिला. यानंतर झालेल्या बक्षिस समारंभात विजेते ठरलेत. क्वीज काॅपीटिशन मध्ये प्रथम ओम चंदानी आणि कुशल चौधरी व्दितीय नेहा वागळे आणि खुशी सोनार तृतीय खगेश कोल्हे आणि मुबशीर खान स्टेटा गेम मध्ये प्रथम प्रेम भवसार आणि ग्रृप व्दितीय प्रसाद वर्मा आणि ग्रृप तृतीय मनाली सुर्यवंशी आणि ग्रृप प्रथमकेस स्टडी स्पर्धा प्रथम साक्षी कुकरेजा आणि वैशाली कृष्णानी व्दितीय रिया ठाकरे आणिस्नेहल टोकेकर तृतीय मुस्कान आहुजा आणि नेतल वर्मा हे विद्यार्थी विजयी ठरलेत. संजना नाईकने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले आणि आभार मानले. प्राध्यापक समन्वयक म्हणून दिपाली पाटिल आणि धनश्री चौधरी यांनी काम बघितले तरस्टुडंट समन्वयक म्हणुन मयंक सुरळकर, केतन सपकाळे सागर पाटील सयाजी जाधव शिवानी चौधरी संस्कृती नेवे यामीनी भाटिया तेजस येवले ज्ञानेश्वर चौधरी मानसी जगताप कल्याणी निकुंभ विशाल ईंगळे अभिनंदन बुचा यांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.