गुणकारी आल्याचे फायदे

0

लोकशाही, विशेष लेख

 

ओला मसाला विकत घेताना त्यात आल्याचे एखाद-दोन तुकडे हमखास असतात. गृहिणी आल्याचा वापर सर्रास लसणीसोबत करतात. जेवणाची चव वाढवण्यापेक्षाही काही उपयोगी गुणधर्म आल्याचे आहे जे हळूहळू आपण विसरत चाललो आहोत. पूर्वी आजीच्या बटव्यात आल्याला विशेष स्थान होतं. सर्दी खोकला (cold cough) झाला की हमखास आल्याचा उपयोग केला जायचा. पण हल्ली सर्दी खोकल्यावर औषध बाजारात मिळू लागल्याने आल्याचं महत्त्व कमी होऊ लागलं पण असं असलं तरी आल्याच्या गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचे फायदे हे प्रत्येक गृहिणीला माहिती असलेच पाहिजेथंडीच्या काळात आलं फारच फायदेशीर असते. थंडीत शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग होऊ शकतो.  आल्याच्या तुकड्याला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी ते खाल्यास तोंडाची गेलेली चव परत येते. चांगली भूक लागण्यासाठीदेखील वरील उपाय करुन पाहू शकता. सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी (Headache) असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा. थोडी आग होते, पण लगेच डोके उतरते. सतत खोकला येत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे, खोकला थांबतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.