विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू होणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमासाठी १ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहे. ज्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा नोकरी करीत असल्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही अशा विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व व्यवसाय करणाऱ्या महिला, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना बहि:स्थ पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे.

यात मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र, हे विषय घेऊन एम.ए. करता येईल. एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम. हे अभ्यासक्रम देखील करता येणार आहे. पाठयक्रम हा कबचौ उमविचाच राहणार आहे. प्रवेशीत विद्यार्थ्यांना विषयानुसार स्वयंअध्ययन साहित्य छापील पुस्तके, मुद्रित, टंकलिखिते व अनुषंगिक तत्सम साहित्य सॉफ्ट कॉपी स्वरुपात देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या http://www.nmu.ac.in संकेतस्थळावर Quick Link अंतर्गत DEEL (External Mode) वर माहिती पाहता येईल, असे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी सांगितले..

 

Leave A Reply

Your email address will not be published.