कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव ;- कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेर होऊन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की प्रियंका ज्ञानेश्वर तिरमले वय 27 राहणार झिपरू अण्णा शाळेजवळ यांचा विवाह ज्ञानेश्वर भाईदास तिरमले यांच्याशी रितीरिवात्यानुसार झाला होता. मात्र लग्नानंतर 18 फेब्रुवारी 2018 ते 26 ऑक्टोबर 2023 दरम्यान पती ज्ञानेश्वर भाईदास तिरमले ,सासरे भाईदास मानका तिरमले आणि सासू लताबाई भाईदास तिरमले ननंद मनीषा राकेश तिरमले यांनी लग्नात आम्हाला मानपान दिला नाही तसेच हुंडा दिला नाही. आमच्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज असून ते फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी महाराणा शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांनी विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेअर कॉन्स्टेबल किरण पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.