महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच परीक्षेत राकेश धनगर उत्तीर्ण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य पंच परीक्षेत गुलाबराव पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले आहेत.

या यशासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील तसेच संचालक प्रताप पाटील, विक्रम पाटील, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन भावसार, कार्याध्यक्ष शाम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, उपाध्यक्ष चद्रकांत लोढाया, बशीर बागवान, खजिनदार सुनील राणे, पंच मंडळ अध्यक्ष अलेक्झांडर मणी, चैत्राम पवार, ॲड. रोहन बाहेती तसेच मुख्याध्यापक डी डी कंखरे, सचिन पाटील, योगेश करंदीकर आणि जी.पी.एस. परिवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.