Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
    जळगाव

    के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 19, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव येथील के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे व्हर्च्यूअल आंतरराष्ट्रीय परिषद् दि ११ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन डिन काॅमर्स अॅन्ड मॅनेजमेंट पुणे विद्यापीठ प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. केसीईचे कोषाध्यक्ष डि टी पाटील ह्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. जळगाव येथील केसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय
    व्यवसाय आणि संशोधन परिषद ” न्यु नॉर्मलमध्ये व्यवसाय आणि संशोधनातील शाश्वत संकल्पना ” ह्या प्रमुख विषयावर संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर परिषद अध्यक्ष प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, कन्व्हेनर डॉ. वर्षा पाठक, पराग नारखेडे, तनुजा फेगडे डीन हे होते.

    या परिषदेचे आ़ॅनलाईन उद्घाटन प्रा. डॉ. पराग काळकर डिन काॅमर्स अ़ॅन्ड मॅनेजमेंट, पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पराग काळकर यांनी “न्यु नाॅर्मलमुळे शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या बदलांचा आढावा घेतला. विद्यारथ्यांनी बदलांना तयार असावे, प्रत्येक क्षेत्र हे आय टी आणि डिजीटलाईझेशनशी निगडीत होत आहे, या नवीन जगाला सामोरे जाण्यासाठी स्वतः ला समर्थ बनवा.

    दुबई विद्यापीठाचे इमेरिटस प्रोफेसर डॉ. अनंथ राव हे व्हर्च्यूअल कान्फरन्सच्या माध्यमातुन परिषदेचे प्रमुख बिज भाषण करतांना म्हणाले. ” निती आयोग अनेक गोष्टी, अनेक बदल आणि ट्रानसफाॅरमेशन, शोधत असतो. संशोधन करुन प्रथमिकता ठरवून सर्व गोष्टी कंट्रोल करत असतो. जागतिक आरोग्य सुधारणाच्या पार्श्वभूमीवर भारताने उत्तम काम केले आहे. पर्यावरण आणि आरोग्य सुधारणा विषयी बोलताना हेल्थ सेक्टर समोरचे प्राॅब्लेम त्यांनी विस्ताराने चर्चा करुन तिथल्या गॅपनंतर, तिथे उपाय योजना काय केल्या पाहिजे याविषयी चर्चा केली. बहुविध शाश्वत विकासावर त्यांनी भर दिला.

    त्याचप्रमाणे अमेरिकेतील इन्फोसिसचे सिनीअर डायरेक्टर आणि हेड अ़ॅनालिटीक्सचे अजय उपाध्याय हे मान्यवर प्रमुख पाहणे आय.टी. क्षेत्रातील सद्य स्थितीत होणारे बदल यावर केसस्टडी व्दार विश्लेषणात्मक विषयाची मांडणी ते केली. माहितीचा विस्फोट या गंभीर विषयांचे विष्लेषण केले.

    या परिषदेसाठी देश विदेशातील संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांचे हे संबंधीत विषयातील संशोधनात्मक निबंध इ कॉन्फरन्सव्दारे प्रदर्शित करण्यात आले. या परिषदेचा प्रमुख उद्देश, नविन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनात्मक संकल्पना मांडता यावी हा होता, आलेले चांगले संशोधनात्मक निबंध संकलित करून त्यांचे संदर्भिय पुस्तक प्रकाशित करण्यात येईल असे परिषदेच्या अध्यक्षा आणि केसीई आय एम आर च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बडाळे यांनी सांगीतले.

    संस्थेचे प्राध्यापक केसीईचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन कले होते. निमंत्रक म्हणून प्रा. डॉ. वर्षा पाठक, आणि डॉ. पराग नारखेडे, परिषद सचिव म्हणून डॉ. अनुपमा चौधरी यांनी काम बघितले. दुपारच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून पुणे येथील डॉ सिमा संत यांनीही परीक्षण केले.

    अनिलकुमार मार्थी यांनी सुत्रसंचलन केले.दुपारचे सत्र दोन भागात संपन्न झाले. त्यात मॅनेजमेंट स्टडीज आणि माहिती तंत्रज्ञान हे विभाग होते. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या शोधनिबंधासाठी हैदराबाद येथील डॉ. अपर्णा भाले यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. आणि या विभागाचे सुत्रसंचलन श्वेता फेगडे यांनी केले.
    या शोध निबंधामध्ये मॅनेजमेंट गट
    (प्राध्यापक गट)
    जोसेफ जॉन फर्नांडिस – भांडुप मुंबई
    विद्यार्थी गट
    सायली नेहेटे, अपूर्वा भिरुड आणि रिया परदेसी
    आय टी गट
    प्राध्यापक गट
    प्रा. श्री. भानुदास पांचाभाई
    विद्यार्थी गट
    वैभव माळी
    राहुल पाटील
    यामिनी महाजन

    या परिषदेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि परिसरातील संशोधक व प्राध्यापकांनी हजर राहून परिषदेवा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे. या प्रसंगी सभागृहात १५० विद्यार्थी आणि आ़ॅनलाईन ७५ मान्यवर उपस्थित होते.

    jalgaon K.C.E. Society's Institute of Management and Research
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif