MIM ची महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर; संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी ही ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्यावरून राजकीय चर्चा रंगत असून भाजपकडून शिवसेनेवर टीका होत आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

युती होणार असल्याच्या सर्व अफवा

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. यातच जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा आहेत, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

संजय राऊत हात जोडत म्हणाले..

दरम्यान एमआयएमने सांगितले की, आता पर्यंत आम्हाला भाजपची बी टीम म्हणून ओळखल जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले, एमआयएम हे भाजपची बी टीमच आहेत. हे उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये आम्ही पाहिलं आहे, सिद्ध झालं आहे. त्यामुळे आमचे स्पष्ट मत आहे, ज्यांचे आदर्श औरंगजेब आहेत, मग ते कोणीही असतील ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. अशा पक्षांशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध येणार नाही, येवू शकत नाही. त्यांच्याशी आमची कोणतीही छुपी किंवा उघड युती होवूच शकत नाही. ज्यांच्याशी त्यांची छुपी युती आहे ती त्यांची त्यांना लखलाभ असे म्हणत संजय राऊत यांनी हात जोडत एमआयएमशी कोणत्याही प्रकारची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले.

एक चाक जोडून चारचाकी बनवा

तसेच एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर देत म्हणाले की, तुमचं तीन चाकी सरकार आहे. त्याला आणखी एक चाक जोडून चारचाकी बनवा. आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. माझा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, असे त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.