“चला दापोली.. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”; सोमय्यांच्या ट्वीटमुळे खळबळ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं.

तसेच किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट बाबत तक्रार केली होती. दरम्यान आता आता किरीट सोमय्या यांनी थेट हे रिसॉर्ट पाडण्याबाबत ट्विट केले आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा बिघडण्याची शक्यता आहेत.

आज सकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी लिहिले आहे कि, “26 मार्च – चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यानंतर आता सोमय्या यांनी तारीख जाहीर करुन रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.