पत्रकाराचा नाशिक येथे रेल्वेच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा येथील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या व “पोलीस आजतक” या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे (वय ४५) यांचा दि. १७ रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजच्या दरम्यान नाशिकरोड येथे रेल्वेच्या धक्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्रविण दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कंटूंबियासह वास्तव्यास गेले होते. यांचे पाच्छात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार असून त्यांचे मृत्यू प्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचेवर दि. १८ फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदिप दिवटे यांचे मोठे बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.