अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जो बायडन’ येणार भारतात, पण ‘या’ कारणाने आहेत नाराज !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जो बायडन’ (Joe Biden) भारतात येणार आहे. सात सप्टेंबर रोजी ते भारताच्या दौऱ्याला सुरुवात करतील. तर दुसरीकडे ८ सप्टेंबर रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीमध्ये सामील होणार आहे. पुढे होणाऱ्या ९ आणि १० सप्टेंबर रोजी शिखर परिषदेत देखील ते सहभागी राहतील. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिम्पिंग (Shi gimping) हे भारतातील होणाऱ्या G20 परिषदेत सहभागी होणार नाही असे म्हंटले जात आहे.

“मी भारतामध्ये जाण्यासाठी भारत भेटीसाठी उत्सुक आहे. परंतु चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये सहभागी होत नसल्यामुळे मी निराश आहे” असे पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले.

यावर G20 लीडर्स समितीचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी यांनी सांगितले शिखर परिषदेतील सहभागाबाबत अद्याप लेखी पुष्टीकरण करण्याची प्रतीक्षा आहे. काही रिपोर्टेस मध्ये असे म्हटले आहे की, ते दिल्ली येथे येणार नाही याबाबत परदेशी म्हणाले की, आम्ही हे फक्त वर्तमानपत्रात पाहिले आहे. मात्र लेखी खात्रीच्या आधारेच काम करतो. ते अद्याप आम्हाला मिळाले नाही. यावर काहीही सांगता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.