Jio ची जबरदस्त ऑफर; पैसे नसतानाही ग्राहकांना करता येणार रिचार्ज

0

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एका जबरदस्त प्लॅनची सुरुवात केली आहे. या प्लॅनअंतर्गत आता ग्राहक पैसे न देताच 5 वेळापर्यंत रिचार्ज करू शकतील. ही एक एमर्जेंन्सी डेटा लोन सर्व्हिस आहे. या सर्व्हिसचा वापर युजर्स डेली डेटा लिमिट संपल्यानंतर करू शकतात. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय हाय-स्पीड डेटा एक्सपिरिएन्सचा लाभ युजर्स घेऊ शकतील.

एका पॅकची किंमत 11 रुपये –

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व्हिस खास अशा लोकांसाठी ज्यांना दररोज मिळणारा 4G इंटरनेट डेटा कमी पडतो. असे ग्राहक आता हाय-स्पीड डेटा कोटा संपल्यानंतर त्वरित रिचार्ज करू शकतील. त्यांना एमर्जेंन्सी डेटा लोन सुविधेअंतर्गत ‘रिचार्ड नॉउ अँड पे लेटर’ची सुविधा मिळते. या सुविधेअंतर्गत प्रीपेड युजर्सला 1GB चे 5 Emergency डेटा पॅक्स (11 रुपये डेटा पॅक) उधार घेण्याची परवानगी मिळते.

Jio App वर असा करता येईल रिचार्ज –

सर्वात आधी MyJio App वर जावं लागेल. इथे पेजच्या टॉप लेफ्ट साईटला Menu वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर मोबाईल सर्विस ऑप्शनमध्ये Emergency Data Loan ओपन करावं लागेल. त्यानंतर एमर्जेंन्सी डेटा लोन बॅनरसाठी Proceed वर क्लिक करावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.