रोटरी क्लब पाचोरा-भडगावची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

0

पाचोरा | प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव ची महत्वपूर्ण बैठक दि. ३ जुलै रोजी दिशा डेंटल क्लिनिक, पाचोरा येथे संपन्न झाली. या बैठकीत रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव चे नूतन अध्यक्ष म्हणून रॉट. डॉ. बाळकृष्ण पाटील तर नूतन सचिव म्हणून रोट. डॉ. पंकज शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रोट राजेश मोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत रोटरी क्लबचे अध्यक्ष रोट. डॉ.प्रशांत पाटील यांनी गतवर्षाच्या कार्यकाळातील उपक्रमांची उजळणी सदस्यांना करून दिली. यावेळी उपप्रांतपाल रोट. राजेश मोर यांनी आपल्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनात रोटरी क्लब च्या आधारभूत सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली आगामी वर्षात स्थानिक रोटरी क्लब चे उपक्रम समाजोपयोगी व अभिनव असावेत याबाबत सूचना केल्या. नूतन वर्षाच्या पदग्रहण समारंभा बाबत चे नियोजन व संचलन या बाबत रोटेरियन राजेश मोर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत रोट. शैलेश खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष रोट. डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी आगामी वर्षाचे प्राथमिक नियोजन व नियोजित उपक्रम बाबतचा आराखडा सदस्यांसमोर मांडला. क्लबचे सचिव रोट डॉ. अमोल जाधव यांनी आभार प्रकटन केले. वर्षपूर्ती च्या या महत्त्वपूर्ण बैठकीला रोट. डॉ. गोरख महाजन, रोट. शिवाजी शिंदे, रोट. डॉ. स्वप्निल पाटील, रोट. अतुल शिरसमणे, रोट. डॉ. पवन पाटील, रोट. डॉ. वैभव सूर्यवंशी आदी सदस्य उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.