चांगली बातमी : किडनी देऊन पित्याने मुलाला दिले जीवदान !

0

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर पित्याने मुलाला स्वताची एक किडनी देऊन जीवदान दिल्याची घटना जामनेर (jamner ) तालुक्यातील तिघ्रा (tighra )येथे घडली असून पित्याच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील टिघ्रा येथील रहिवासी रमाकांत याचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्मच झाला. काही दिवसांपूर्वी त्याला अस्पष्ट दिसणे व चक्कर येणे हे लक्षणे जाणवु लागले. रमाकांत हा शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये आला. सर्व तपासणी केल्यानंतर डॉ. प्रशांत पाटील यांच्या निदर्शनात आलं की त्याच्या दोन्ही किडनी या निकामी झालेल्या आहेत .त्यात रमाकांतचे वय अवघे २४ वर्षे तर घरची परिस्थिती अतिशय हालाकिची त्यात त्याला छोटी छोटी मुलं. त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचं कळाल्यावर त्याच्या घरच्यांसाठी हा खूप मोठा आघात होता.

परंतु स्वतः रमाकांत व त्याचे वडील हे दोन्ही अतिशय खंबीर होते. वयस्कर वडील दुःख पचवून कुठल्याही परिस्थितीला न डगमगणारे नसुन संकटाला सामोरे जाणारे होते. अशा परिस्थितीत गावकरी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले.त्यांनी रमाकांतला छत्रपती संभाजी नगर येथे कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. दाखल केल्यानंतर सर्वात मोठा विषय होता तो पैशांचा परंतु जे होईल ते होईल त्यातून मार्ग निघत राहिले. प्रसंगी दोन्ही बापलेकांच्या तपासण्या चालू असतांना अचानक एकादिवशी डायलिसिस मध्ये रमाकांतची तब्येत अतिशय गंभीर झाली. परंतु “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय आला. त्यातूनही तो सुखरूप बाहेर पडला. डॉ. त्यांच्या इलाजाचे काम करत होते. तर नातेवाईक हे उपचारासाठी पैसे गोळा करायचे काम करत होते. वडिलांचे ही मन देखील मुलाला किडनी देऊन नवीन जन्म देण्यासाठी खंबीर झालेलं होतं.

रमाकांतचा पूर्णतः विश्वास डॉ. प्रशांत पाटील यांच्या वर होता. स्वतः गोळा केलेली रक्कम व त्याचबरोबर शासन दरबारी पाठपुरावा करून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची मदत रमाकांतला डॉ. प्रशांत पाटील यांनी उपलब्ध करून दिली. सर्वार्थाने यश येऊन रमाकांतचे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या .

आज अखेरीस रमाकांतच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याला व त्याच्या वडिलांना भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा डॉ. प्रशांत पाटील यांनी दिल्या. जामनेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी नेहमीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील हे आशेचा किरण ठरत आहेत. रुग्णात देव शोधणारे व रुग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानून जमेल तितके सहकार्य तसेच मदत डॉ. प्रशांत पाटील यांच्या वतीने होत असते. त्यांच्या या अनमोल सहकार्याचे बक्षीस म्हणून टिघ्रा गावातील गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना गजानन महाराज मंदिरात त्यांच्या हस्ते आरतीचा बहुमान देखील देण्यात आला . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष झाल्टे, भैया चौधरी, राहुल गायकवाड, अक्षय इत्यादी गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.