पत्नीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले !

0

धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील घटना

धरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
भांडण झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर रागात पेटवून दिल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे  रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिला जाळणारा पती देखील ५५ टक्के भाजला असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीराबाई संतोष भिल (५५) असे मयत महिलेचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संतोष भिल (वय ६३) याचा पत्नी मीराबाई (५५) सोबत काही वर्षापासून वाद सुरु होता. त्यामुळे दोघं जण वेगवेगळे राहत होते. संतोष भिल रिंगणगाव ता. एरंडोल येथे तर मीराबाई हिंगोणे बुद्रुक ता. धरणगाव येथे राहत होती. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतोष हा हिंगोणे येथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वा द झाल्यानंतर संतोष याने पत्नी मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकत असतांना त्याच्याही अंगावर शिंतोडे उडाले होते. त्यामुळे पत्नीला पेटवताना संतोषच्या अंगाला देखील आग लागली. या घटनेत मीराबाई पूर्णपणे भाजली तर संतोष हा ५५ टक्के भाजला होता.

मीराबाई हिला तात्काळ जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दरम्यान उपचारादरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तर संतोष याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.