“श्री भगवान महावीर जयंती” पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आज ३ एप्रिल रोजी “भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव” निमित्त श्री सकल जैन संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ८ वाजता भ.महावीर चौकातून “अहिंसा रॅली” (Ahimsa rally) चे आयोजन करण्यात आले होते. सर्वात पुढे जैन समाजाचे संत उपस्थित होते,व नंतर ४००/५०० पुरुष/महिला व तरुणांनी आपला सहभाग नोंदवला. अहिंसा रॅली मध्ये भ.महावीरांच्या जयघोषाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

रॅली नंतर आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात अध्यक्ष राहुल जैन, तसेच संघपती सुमित संचेती तसेच मूर्तिपूजक अध्यक्ष किशोर डेडीया यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झेंडावंदन करण्यात आले. नंतर भ.महावीर जयंती निमित्त जैन संत आचार्य भगवंत यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सकल जैन संघाचे अध्यक्ष अजयशेठ पगारीया यांनी केले. या नंतर माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष राहुल जैन, किशोर डेडिया, तसेच सुमित संचेती यांनी पुष्पहार, बुके व राजस्थानी पगडी देउन केला. या प्रसंगी मंचावर गुलाबराव वाघ, निलेश चौधरी,ज्ञानेश्वर महाजन, सी.के.पाटील, कैलास माळी , संजय महाजन, विनय उर्फ पप्पु भावे, वासुदेव चौधरी, भानुदासजी विसावे, मान्यवर उपस्थित होते व त्यांचा सत्कार जैन समाजाचे पंच व गो सेवा समिती तर्फे करण्यात आला.

 

मा.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते इ.१० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्व.लिलाबाई पुनमचंद पगारिया स्मरणार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. नंतर माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी जैन समाज व भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. व अहिंसा, सत्य व त्याग या बद्दल जैन समाजाचे कौतुक करून हे सर्वांनी अंगीकारले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शाकाहार हीच आजच्या काळाची गरज असल्याची भावना पण व्यक्त केली. नंतर मंत्री महोदयांनी आपल्या गो शाळेस ₹ ५१०००/- मदत स्वतः दिली,व नगरपालिका द्वारा ₹ २ लाखांचा चेक कामधेनू गोशाळेचे अध्यक्ष प्रा.सी. एस. पाटील सर व राजू ओस्तवाल यांना सुपूर्द केला. त्यावेळी सकल जैन समाजाने टाळ्यांच्या गजरात मा.मंत्री महोदयांचे कौतुक केले.

दुपारी १२ वाजता भ.महावीरांचा पाळणा (जन्म महोत्सव) मंदिरात राजुलमती महिला मंडळाद्वारा साजरा करण्यात आला. व नंतर महाप्रसादाचे आयोजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. व सायंकाळी रथावर भगवान महावीरांचा फोटो लावून व रथ सजवून भव्य अशी मिरवणूक ढोल-ताश्यांचा गजरात काढण्यात आली. तरुण मंडळींनी लेझीम खेळून,व महिलांनी गरबा नृत्य सादर केले. त्यानंतर समारोप आदिनाथ जैन मंदिरात करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.