वाळू उपशासाठी तराफ्यांचा वापर ; बोरनार येथे कारवाईत सात तराफे नष्ट

0

जळगाव : गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वाळूमाफियांकडून वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. तालुक्यातील बोरनार येथील नदीपात्रातून तराफांद्वारे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूलसह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली. वाळू उपशासाठी वापरले जाणारे सात तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.

मंगळवारी बोरनार येथे महसूल व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कारवाई केली. याठिकाणी वाळू उपशाच्या उद्देशाने नदी काठावर लावण्यात आलेले सात तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. तसेच त्याला लावण्यात आलेल्या नायट्रोजनच्या टाक्याही तोडण्यात आल्या. या शिवाय बाजूला काठावर आढळून आलेली वाळू पुन्हा नदीपात्रात टाकण्यात आली.

जळगाव तालुक्यातील धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफेच्या सहाय्याने वाळूची चोरी होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. सोमवारी सकाळी ९ वाजता महसूल विभागा आणि तालुका पोलीसांना धा शिवारातील गिरणा नदी पात्रातून तराफेच्या सहाय्याने वाळूची चोरी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीसांनी १ ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.

ही कारवाई तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी ए.यु. आंधळे, तलाठी प्रकाश जामोदकर, चंद्रकांत ठांगे, नितीश ब्याळे, पोलिस नाईक स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, पोलिस पाटील शेखर बडगुजर आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.