Friday, May 20, 2022

“विश्वशांती दौड”ला जळगावकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव :- श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती तर्फे महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नवली चौक जळगाव येथून “विश्वशांती दौड” आयोजित केली होती. भगवान महावीर (जयंती) जन्म कल्याणक पर्वाचे औचित्य साधुन वर्तमानात प्रभु महावीर यांचे अहिंसा, सत्य हे शाश्वत विचारच जगात शांतता आणी सद्भाव प्रस्थापित करू शक़तील, हा महत्वाचा विचार घेवून ह्या “विश्वशांती दौड” चे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

“विश्वशांती दौड” भाऊंचे उद्यान- आकाशवाणी चौक- स्वतंत्र स्वतंत्र चौक- चिमुकले राम मंदिर- स्वतंत्र चौक- आकाशवाणी चौक मार्गे काव्यरत्नवली चौक येथे समाप्त झाली. सहभागी झालेल्या नागरिकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विश्वशांती दौडला मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या वेळी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, माजी महापौर नितिन लड्ढा, करीम सालार, जन्मकल्याणक समीती अध्यक्ष स्वरूपकुमार लुंकड़, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक युवासेना सहसचिव विराज कावडीया, विशाल चोरडिया, जयआनंद ग्रुप व युवाशक्ति फाउंडेशनचे सदस्यगण उपस्थित होते.

भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशन तर्फे प्राप्त रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

युवक, कार्यकर्ते, महिला सदस्या आदींनी परिश्रम घेतले.

ह्या अभिनव विश्वशांति दौड मध्ये डॉ प्रशांत देशमुख, किरण बच्छाव, अविनाश काबरा, विक्रांत सराफ, ववेक पाटील, प्रेमलता सिंग, वेदंती बच्छाव, डॉ भूषण झवर, कविता पाटील, गुरुप्रसाद तोतला, डॉ राहुल महाजन, डॉ तुषार कोठावदे, विद्या बेंडाळे यांच्यासह जळगावच्या विविध संघटना, मंडळ, रनिंग गृप्स, महिला, युवा व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सर्व रनर्स साठी पेयजल आणी शरबत वितरित करण्यात आले.

जीवदया संस्कार उपक्रम अंतर्गत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे पात्र (परळ) निशुल्क वितरित केले. सोबत पशुपक्षी साठी करुणा भाव रोपण करण्याच्या उद्देशाने जीतो लेडीज विंग- महावीर ज्वेलर्स तर्फे पशुपक्षी खाद्य सामग्री चे पकिट मोफत वितरित करण्यात आले जेणेकरून जीवदया संस्कार समृद्ध होतील.  सूत्र संचलन गिरीश वि. कुलकर्णी यांनी केले. सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती – २०२२ तर्फे उत्स्फूर्त सहभागासाठी समस्त जळगावकरांचे विशेष आभार.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या