पालकमंत्र्यांना हटवा! राज्यपाल महोदयांची भेट घेऊन केली मागणी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव:- सिव्हिल हॉस्पिटल मधील औषधी व वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी करताना ४४ कोटीचा अपहार झाला. याची तक्रार कलेक्टर,पोलीस स्टेशन व पालकमंत्री कडे करूनही कोणतीही चौकशी होत नाही. कोणतीही कारवाई होत नाही. लोकांना गुमराह करण्यासाठी सिव्हिल सर्जन ची बदली केली.जेणेकरून लोक चूप बसतील. पण बदली ही शिक्षा नसते.पर्याय नसतो.ती तर तीन वर्षांनी होतेच.हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळत नसावे का? आरोग्य मंत्री राजेश टोपेंना कळत नसावे का? कोरोना आपत्ती काळात औषधी व वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी दिलेले ४४ कोटी हे जनतेचे प्राण वाचवण्यासाठी दिले होते.अपहार करून घबाड भरण्यासाठी नाही. हे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,जे डीपीडीसीचे अध्यक्ष आहेत,यांना कळत नसावे का?

याची कागदपत्रे दिनेश भोळे व माधुरी अत्तरदे यांनी हस्तगत केली.पोलिसात तक्रार केली.तरीही एफआयआर दर्ज होत नाही. कारण यात पालकमंत्री चा अडसर आहे. पोलीस निरीक्षक पेक्षा पालकमंत्री पद घटनात्मक दृष्टीने मोठे आहे. कलेक्टर, एसपी पेक्षा ही मोठे आहे. म्हणून या तक्रारी ची चौकशी होत नाही. म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली पाहिजे. जर मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंना जास्त आस्था असेल तर त्यांनी यांना बांद्रा चे पालकमंत्री बनवावे.पण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे पालकमंत्री म्हणून ते विश्वासपात्र ठरले नाहीत. त्यांचेकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाही. मला कळत नाहीत, हे उत्तर पुरेसे नाही. कळत नसेल तर पद सोडावे. अशी आमची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्यातील मंत्री इडीच्या रडारवर आहेत.दोन मंत्री जेलमधे आहेत.आम्हाला याचे वाईट वाटते पण भ्रष्टाचाराची चीड ही येते.दोन मंत्री जेलमधे असूनही पालकमंत्री गुलाबराव पाटील या अपहाराकडे लक्ष देत नाहीत किंबहुना चौकशी करू देत  नसावेत.म्हणून त्यांच्या पदाचा प्रभाव कमी करणे आवश्यक आहे.

डीपीडीसी सदस्य मा.चिमणराव पाटील यांनी सुद्धा या खरेदीवर आक्षेप घेतला असता,पालकमंत्री पाटील यांनी त्यांना अडवले.”आबासाहेब सरकार आपले आहे, सांभाळून घ्या.” यातच पालकमंत्री ची मानसिकता लक्षात आली आहे.त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमदार मा.विलास पोतनीस यांनी सुद्धा हा अपहार विधानपरिषदेत मांडला.शिवाय जळगाव डीपीडीसीचे सदस्य श्रीमती माधुरी अत्तरदे यांनी जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली आहे.

तरीही चौकशी होत नसल्याने त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. कोरोना काळात माणसे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन वाचून तडफडत मेली. आणि दुसरीकडे नियोजित निधीचा अपहार झाला. तो ही पालकमंत्री च्या अध्यक्षतेखाली. तक्रार करूनही पालकमंत्री चूप का? असे पालकमंत्री आम्ही जळगाव जिल्ह्यातील जनतेला नकोच.म्हणून पदावनत करण्याची गरज आहे.

आज २८-२-२०२२रोजी आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे चार लोकांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली.समक्ष भेटून हिंदी भाषेत निवेदन दिले. मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेत पत्र देऊनही त्यांनी दखल घेतली नाही.हे विशेष. त्यांना मराठी कळली नसेल कदाचित! म्हणून  शिवराम पाटील यांनी मागील भेटीची आठवण राज्यपाल महोदयांना करून दिली.निवेदनाची दखल घेतल्याबद्दल आभार मानले.तशीच ही मागणी मान्य करावी, अशी विनंती केली.सोबत दिनेश भोळे,अनिल नाटेकर व राकेश वाघ होते.

भाजपचे दोन विद्यमान आमदार ,एक माजी आमदार व कार्यकर्ते त्याठिकाणी भेटले असता, त्यांना हा विषय सांगितला.त्यांनी ही यात लक्ष देण्याचे व राज्यपाल महोदयांना विनंती करण्याचे सांगितले.भाजप आमदार व कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.जळगाव शहरात व जिल्ह्यात कोणतीही समस्या त्यांना भेडसावत नसल्याचे जाणवले. कौरव पांंडवांच्या धुमश्चक्रीत हस्तिनापुरच्या जनतेकडे दोन्ही पक्षांचे लक्ष नसल्याची खंत  जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.