जळगाव दुध संघाचे विक्री विभागप्रमुख अनंत अंबीकर निलंबित…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सातारा जिल्हा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली सदर लोण्याची अंदाजीत किंमत रक्कम रु. ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांना दुध संघाने दि. ११ ऑक्टोंबर रोजी निलंबीत केले असल्याची माहिती आज संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांनी दिली. तसेच यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आरटीओ विभागातील भ्रष्टाचार संबंधी माहिती दिली.

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिनांक ७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी चेअरमन यांनी कोजागिरी व दिवाळी सणाच्या निमित्त पहाणीसाठी कार्यकारी संचालकांच्या सोबत प्लॅंट व्हिजीट केली. संघात असलेल्या दूध, लोणी व दूध भुकटी यांच्या साठयाचा आढावा घेतला. कार्यकारी संचालकांना सर्व साठयांची भौतिक तपासणी करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने कार्यकारी संचालकांनी संघाच्या एका टिमला दिनांक ८ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रात्री ठीक ९.३० वाजता दूग्धजन्य पदार्थाच्या साठयाची भौतिक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. भौतिक पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, साठा रजिष्टर / रेकॉर्डमधे असलेला साठा व प्रत्यक्ष तपासणी केलेला साठा यामधील तफावत लपविण्यासाठी दिनांक २ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रेकॉर्डमधे १४ मे.टन गाय लोणीची गाडी वाई, जिल्हा सातारा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली आहे. सदर लोण्याची अंदाजीत किंमत ७०-८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही.

मे.पी.डी. शहा कोल्ड स्टोअरेज, वाई, जिल्हा सातारा यांच्या शीतगृहात संघाकडे असलेला लोणी साठा, संघाच्या शीतगृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक मात्रामधे उत्पादित झालेले लोणी साठवणूक केले जाते व दिवाळी सणासाठी सदरचे लोणी तूप उत्पादनासाठी पुन्हा संघात परत वाहतूक केली जाते. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. सदरच्या साठयाची भौतिक पडताळणी रात्री २.३० वाजेपर्यंत सुरु होती व कार्यकारी संचालक त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. दि. ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी रविवार रात्री संघाने एक पथक, ज्यामधे संघाचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व अंतर्गत लेखा परिक्षक सामिल होते. पी.डी. शहा, वाई, जिल्हा साताराकडे रवाना केले. दि. ११ ऑक्टोंबर, २०२२ रोजी संघाकडे असलेली दूध भुकटीच्या साठयाच्या पडताळणीचे निर्देश कार्यकारी संचालकांनी दिले व त्यामधे सुध्दा सुमारे ९.०० मे.टन अंदाजित किंमत रु. ३०-३५ लाख चा साठा हा रेकॉर्डपेक्षा कमी आढळून आला. संघाने दूध भुकटी व लोणी यांचा इन्चार्ज महेंद्र नारायण केदार ऑफिसर-१ व त्या विभागाचे २ स्टॉक असिस्टंट तसेच ज्या विभागाकडे हा साठा ठेवण्याची जबाबदारी आहे, अर्थात विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अबीकर यांना संघाने दिनांक ११ ऑक्टोंबर, २०२२ रोजी निलंबीत केले आहे. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देखील देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.