व्यापाऱ्यांना ६० लाखाचा चुना; दोघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावसह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी घेवून सुमारे ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील डेमला कॉलनीतील रहिवासी महेंद्र सतिषचंद्र ललवाणी यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ समर एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे.२०१३ मध्ये निलेश शांताराम पाटील व दिनेश पाटील या दोघांनी श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले होते. हे दोघ ललवाणी यांच्याकडून होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेवून जात होते. त्यांनी ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेवून रोख व उधारीने घेवून जात होते. यावेळी त्यांनी ललवाणी यांचा विश्‍वास संपादन केला.

मात्र या दोघांकडे सुमारे ११ लाख ८६ हजार ७३ रुपये बाकी आहेत. त्यांना बाकी असलेल्या पैशांसाठी फोन करुन व त्यांच्या घरी जावून मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान महेंद्र ललवाणी यांनी या दोघांबद्दल माहिती काढली असता या दोघांकडे अनेक व्यापार्‍यांचे पैसे बाकी असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यावेळी ललवाणी यांच्यासह अनेक व्यापार्‍यांना दोघांनी लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

जळगावसह भुसावळ, धुळे, पुणे येथील व्यापाऱ्यांना एकुण ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी महेंद्र ललवाणी यांनी सोमवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली .त्यांच्या दिलेल्या तक्रारीवरून निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील दोघ रा. प्लॉट नंबर १२ भुरेमामलेदार प्लॉट, शिवाजीनगर या दोघांवर शहर पोलिसात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.