वैचारिक वारसा पद्धतीने महात्मा ज्योतीराव फुले जयंती साजरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर; थोर क्रांतिकारी समाज सुधारक, बहुजनांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणारे सत्यशोधकी महापूरूष महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९६ व्या जयंती दिनानिमीत्त ११ एप्रिल सोमवार रोजी बहुजन उद्धारक सेवा समिती द्वारे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या मुर्तीला माल्यार्पन व सामुहिक अभिवादन करून वैचारिक वारसा वृद्धींगत होण्याच्या उद्देशाने येथिल स्वामी विवेकानंद आश्रमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी निर्बंध असल्याने सामुहिक स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकलेले नाही. परंतु सध्या परिस्थिती पुर्ववत होत असल्याने महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती नेहमीच्या वैचारीक वारसा पद्धतीने साजरी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये चैनसुख संचेती, मोहन शर्मा, मिलिंद डवले, मुख्याध्यापक एस.डी.उमाळे, आर.आर.पाटील, माजी मुख्य अभियंता येवतकर,पत्रकार हरीभाऊ गोसावी, संजय काजळे, विवेकानंद आश्रमाचे सचिव प्रफुल्ल खर्चे आदींसह अनेक मान्यवर, पत्रकार व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान रवींद्र पढार यांनी महात्मा ज्योतीराव फुलेंच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकणारे भाषण केले. यावेळी आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार प्राप्त सुरेश उतपुरे, उत्कृष्ट जिल्हा  क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त विजय पळसकर व खेलो ईंडिया साठी निवड झालेली वेटलिफटिंग राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू कु. दिपाली देवकर आदिंना स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

संचलन प्रा डाॅ नितीन भुजबळ तर आभार प्रदर्शन मंगेश सातव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष बोंबटकार, अनिल बगाडे, पंकज देविकार, दिपक बावसकार, निरज येवतकर, संजय कातव, दिपक राऊत, किशोर राऊत यांच्यासह बहुजन उद्धारक सेवा समितीच्या अणेक स्वयंसेवकांचे योगदान राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.