जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80. 24 टक्के मतदान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच पदासाठी व सदस्य पदाकरिता मतदान काल 18 डिसेंबर रविवार रोजी पार पडले. यात एकूण जिल्हाभरात 80.24% मतदान झाले असून 1 लाख 69 हजार 307 मतदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाभरात जळगाव, जामनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, भडगाव, चाळीसगाव या सर्व 14 तालुक्यांमध्ये सरपंच व सदस्य पदाकरिता ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान काल 18 डिसेंबर रविवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. मतदानात कुठेही गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

यामध्ये जळगाव तालुक्यात 87.70% जामनेर तालुक्यात 88.86% धरणगाव तालुक्यात 83.84% एरंडोल तालुक्यात 84.35% पारोळा तालुक्यात 83.08% भुसावळ तालुक्यात 76.55% मुक्ताईनगर तालुक्यात 76.82% बोदवड तालुक्यात 80.55% यावल तालुक्यात 79.67% रावेर तालुक्यात 77.58% अमळनेर तालुक्यात 89.70% चोपडा तालुक्यात 73.36% भडगाव तालुक्यात 80.89% तर चाळीसगाव तालुक्यात 79.04% टक्के मतदान झाले.

एकूण जळगाव जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 140 इतकी होती, तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 122 इतकी होती. जिल्हाभरात 421 एकूण मतदान केंद्र सुरू होते. काल झालेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजू बळकट ठरते यासाठी सर्वांना निकालाची ओढ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.