भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनीत बगिच्याचे लोकार्पण

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिरासमोरील ओपन स्पेसमध्ये जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांच्या स्थानिक क्षेत्र विकासनिधीतून तयार करण्यात आलेल्या गार्डनचे लोकार्पण भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली, याबद्दल उपस्थित कॉलनीवासीयांनी आनंद व समाधान व्यक्त केले. तसेच गार्डनचे उर्वरीत काम हे नगरविकास विभागाच्या निधीतून भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीतून पूर्ण होत आहे. सदर काम हे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पाठपुराव्याने शक्य झाले आहे.

याप्रसंगी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील, शरद हिरे, किरण शिंपी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कुंभारे, भाजपा शहर सरचिटणीस बापू शार्दूल, कुणाल पाटील, महाले भाऊसाहेब, जाधव सर, अभिजित पवार, रवि देवरे, प्रितेश पाटील, ललित अहिरे, विजय महाजन, अक्षय चांदुगडे, हेमंत गायकवाड, दिनेश अहिरे, नितीन पाटील, विक्की मोरे, स्वप्निल मिस्तरी, नानू सोनवणे, जितेंद्र कोळी, गोकुळ चौधरी, सागर पाटील, योगेश महाजन, निलेश पाटील, जगदीश पाटील, कृष्णा सोनवणे, उज्ज्वल कॉलनीतील महिला मंडळ तसेच ठेकेदार दिनेश पाटील हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.