तरुणीला तब्बल ६ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस सायबर क्राईमचे (Cyber Crime) प्रमाण वाढतच आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख तयार करून तरूणीची तब्बल ६ लाख ४९ हजार रूपयांत ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवार ५ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. ऑगस्ट २०२२ मध्ये एका डॉ. मार्क नावाच्या व्यक्तीने तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून मैत्री केली. त्यानंतर त्याने तरूणीचा व्हॉटसअॅप नंबर मिळविला. त्यानंतर तरूणीचा विश्वास संपादन करून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी तरूणीकडून तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवले.

दरम्यान पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट तरुणीला पाठवले नाही, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी डॉ. मार्क नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.नी. लीलाधर कानडे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.