तलवार घेवून फिरणारा तरूण ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खेडी गावातील माऊली नगरात हातात तलवार घेवून गावात दहशत माजवित असलेल्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी येथील पाटीलवाडा येथे राहणारा निलेश रावसाहेब पाटील (वय २०, रा. खेडी ता.जि.जळगाव) तरूण हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी सोमवारी, ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत संशयित आरोपी निलेश रावसाहेब पाटील (वय २०, रा. खेडी ता.जि.जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी संशयित आरोपी निलेश रावसाहेब पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. किशोर पाटील, सुधीर साळवे, मुदस्सर काझी, पो.कॉ. छगन तायडे यांनी कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.