रस्त्यावर महिलेचा हात पकडून धमकी देत विनयभंग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका भागात राहणारी महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणारी २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मे रोजी आजाद नगरातील कब्रस्थान जवळून सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पायी जात असतांना आशिफ उर्फ गंधा फैजल याने महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तु मेरी है मेरी ही रहेगी असे म्हणून तिचा विनयभंग केला. तसेच तु मुझे नकार देगी तो मै तेरी लडकी, को ओर तेरे घरवालोंको नही छोडुंगा अशी धमकी दिली.

अखेर महिलेने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी आशिफ फैजल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.