तरुणाच्या डोक्यात फरशी टाकल्याने गंभीर जखमी ; ३ जणांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील अयोध्यानगरातील तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत ईश्वर चौधरी (वय २४, रा. गौरव हॉटेल, अयोध्या नगर, जळगाव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. हेमंत हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शनिवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी अयोध्या नगरातील अयोध्या प्रोव्हीजन येथे रात्री ११ वाजता उभा असतांना काहीही कारण नसतांना स्वप्निल ठाकूर रा. गणेशवाडी, निशांत चौधरी रा. डीएनसी कॉलेज व तप्तर्‍या (पूर्ण नाव माहित नाही) रा.जैनाबाद या तिघांनी मिळून बेदम मारहाण केली.

दरम्यान स्वप्निल ठाकूर याने संतापाच्या भरात रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून तो हेमंतच्या डोक्यात मारला. तसेच इतर दोघांनी हात पकडून निशांत चौधरी याने देखील दगड उचलून हेमंतच्या डोक्यासह त्याच्या हातावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत हेमंत चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

याप्रकरणी हेमंत चौधरी यांच्या फिर्यादीवरून रविवारी, २० फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वप्निल ठाकूर रा. गणेशवाडी, निशांत चौधरी रा. डीएनसी कॉलेज व तप्तर्‍या (पूर्ण नाव माहित नाही) रा.जैनाबाद या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास अतुल पाटील हे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.