दिलासादायक.. जिल्ह्यात आज एक कोरोना बाधित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत आहे. जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात एक बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ०७ जणांनी कोरोनावर मात केलीय.

होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ५९ इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे. नवीन कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात यावल येथे एक कोरोना बाधित रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.