सराफाला लुटणारे दरोडेखोर २४ तासात गजाआड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव विखरण रस्त्यावरील चोरटक्की गावाजवळ रवंजा येथे दि. १६ फेब्रुवारी रोजी सोने चांदीचे व्यापारी राजेंद्र बबन विसपुते यांना पिस्टलचा धाक दाखवून भरदुपारी त्यांच्याकडील सोने, चांदी व त्याचे कडील मोटार सायकल हिसकावून गेले होते.

त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, महेश महाजन, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, गोरख बागुल, पोना नितोन बावीस्कर, राहूल पाटील, अविनाश देवरे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, राहूल बैसाणे, चालक राजेंद्र पवार, चालक मुरलीधर बारी असे व तांत्रिक मदतीकरीता पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, पोह संदिप सावळे, पोकॉ ईश्वर पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे पथक नेमण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखा जळगाववरील पथक हे गुन्हा घडल्याबरोबर घटनास्थळी जावून पाहिले असता आरोपीनी रवंजा येथील पाटा पासून सराफाचा पाठलाग करून रिंगणगाव विखरण रस्त्यावरील चोरटक्की गावाचे पूढे आरोपीतांनी मोटार सायकलने सराफाचे पुढे जावून पुन्हा मागे फिरून आले व सराफाला समोरून मोटार सायलकने ठोस मारून सराफाला खाली पाडून त्यास पिस्टलचा धाक दाखवून त्याचे कडील असलेली सोन्या चांदीची बॅग हिसकावून पळू लागले त्यावेळी आरोपीतांची मोटार सायकल खराब झाल्याने ती तिथेच सोडून सराफाची मोटार सायकल घेवून पळून गेले होते.

यावेळी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी आरोपीनी सोडून गेलेली मोटार सायकल व फिर्यादीची घेवून गेलेली मोटार सायकल बाबत चौकशी करण्याचे आदेश त्याचे पथकास दिले. त्यावरून पथकाने अहोरात्र परिश्रम घेवून दोन्ही मोटार सायकलची माहिती काढत असतांना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की फिर्यादीची मोटार सायकल एम.एच .१ ९ सीबी ९ ७८१ हि डिंगबर उर्फ डिग्या सोनवणे याचे ताब्यात असून त्याचे सोबत इतर २ इसम आहेत.

या माहितीवरून सदर पथकाने वरील तिन्ही इसमांना ताब्यात घेतले. डिंगबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे (वय २३ , रा. भोकर ता. जि. जळगाव ह.मु. वाल्मीक नगर जळगाव) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विशाल अरुण सपकाळे (वय २२, रा. कोळीपेट विठ्ठल मंदिर जवळ जळगाव), विशाल लालचंद हरदे (वय २६, रा. चौगुले प्लॉट जळगाव) या तिघांनी सदर गुन्हा करतेवेळी संदिप राजु कोळी (वय १९ , रा. कुन्हंगी ता.पाचोरा जि . जळगाव ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव) आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, (रा . कोळीपेठ जळगाव) या दोघांनी रेकी केली असून याचे सांगणे वरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

यावरून डिंगबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे, विशाल अरुण सपकाळे, विशाल लाल हरदे, संदिप राजु कोळी यांना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकाने अटक करण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून फिर्यादीची मोटार सायकल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.