जिल्ह्यात नव्याने तब्बल 83 कोरोना बाधित; 374 जणांची कोरोनावर मात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरी जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 83 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 374 जणांनी कोरोनावर मात केलीय. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1412 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. नवीन कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 83 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 25, जळगाव ग्रामीण 5 , भुसावळ 18, अमळनेर 2, धरणगाव 1,  जामनेर 6, रावेर 1, पारोळा 1,  चाळीसगाव 12, मुक्ताईनगर 10, बोदवड 1, आणि इतर जिल्ह्यातील 1.

Leave A Reply

Your email address will not be published.