पिकअप व्हँनच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील शिरसोली वावडदा दरम्यान चारचाकी महिंद्र पिकअप व्हँनच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा रस्त्यावर दुचाकीस्वाराला भरधाव येणाऱ्या एम.एच.१९ सी.यु. ४९६३ महिंद्रा पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिल्याने रणजितर संभाजी पानगडे (वय २०, रा. इंदिरानगर, शिरसोली प्र.न.) हा तरुण जागीच ठार झाला. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

मयत रणजित याच्या पश्चात आई, बहिण, काका असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.