जळगावच्या अवकाशात दिसली उडती तबकडी ? जाणून घ्या काय आहे रहस्य !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

२ फेब्रुवारी गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास अवकाशात प्रकाशमान वस्तू जात असल्याचे चित्र जळगावकर नागरिकांना पाहायला मिळाले . त्यामुळे जळगावकरांनी एक खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. मात्र हि वस्तू स्टारलिंक उपग्रह असल्याचे समोर आले आहे.

गेल्या चार वर्षांपासून अनेक ठिकाणी ते दिसतात. इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी २०१९ साली एकूण ५५ उपग्रह सोडण्यात आले होते. त्यातीलच हा एक असल्याचे खगोलशास्त्राचे अभ्यासक यांनी स्पष्ट केले . गुरुवारी सायंकाळी सात वाजता दिसलेल्या रहस्यमय वस्तूने जळगावकरांमध्ये खळबळ उडाली. अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र जळगावकरांना दिसले. या वस्तूमुळे जळगाव करांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.