योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला फायदेशीर – स्वामी डॉ. ज्ञानवत्सलदास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता व त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरतात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो…जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे. अमुक काम शक्य नाही, ते मी कसे करणार, अशा दृष्टिकोनाने सकाळपासून बसलो तर धावणे तर सोडा, नीट चालताही येणार नाही… दुसरा कोणी ते काम करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? आपला योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला आपल्यासाठी फायदेशीर परिस्थितीत बदलू शकतो. आपली हजारो प्रकारची ऊर्जा ती न वापरता वाया जाते, कारण आपला दृष्टिकोन योग्य नसतो. तथापि, आपल्या आतही निद्रिस्त ऊर्जा असते.

 

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (आय एम आर) आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव च्या संयुक्त तत्वधानांतर्गत आयोजित अक्षरधाम, (बीएपीएस) स्वामीनारायण मंदिर येथील प्रेरक वक्ते स्वामी डॉ.ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट,बी डिफरेन्ट,सकसिड डिफरेन्ट या विषयावर व्याखान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झाले त्यावेळी स्वामी डॉ. ज्ञानवत्सलदास बोलत होते.

यावेळी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, बीएपीएस मंदिर चे आनंद जीवन स्वामी, श्री योगी स्नेहस्वामी, नित्य प्रकाशदास स्वामी, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष डी टी पाटील आदी मंचावर उपस्थित होते.तसेच आय एम आरच्या संचालक डॉ.शिल्पा बेंडाळे,कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे डॉ.संजय सुगंधी, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर आदी उपस्थित होते.

स्वामीजीनी प्रोएक्टिव्ह आणि एथिक्स यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांची आपल्या व्याख्यानातून सहज उकल केली. तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन, व्यवसायातील नैतिकता, मानवीयवृत्ती एकगुरुकिल्ली, चारित्र्य म्हणजे आनंदाचे घर, वर्क-लाइफ बॅलन्स आणि इतर अनेक विषयांवर ते भरभरून बोलले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनआणि आभार पुनीत शर्मा यांनी मानले.कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद बघता नाट्यगृहा बाहेर ४०० बैठक व्यवस्था करण्यत आली होती.

बीएपीएस प्रमुख स्वामी महाराजांच्या जीवनातही अनेक संकटे आली. दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासाठी जमीन मिळवण्यासााठी त्यांना ३२ वर्षे लागली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या मनात सकारात्मक विचारांची ऊर्जा सतत प्रज्वलित राहिली. त्यांनी न थकता, हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. परिणामी, भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकणारे भव्य अक्षरधाम मंदिर आज दिल्लीत उभे आहे. त्यामुळेच जीवनात चांगले आणि सकारात्मक विचार असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग, आपण आपल्या आजूबाजूला असे वातावरण निर्माण करूया, जेणेकरून आपण सर्व चांगल्या विचारांनी सतत चिंब होत राहू.
.एखाद्याने कितीही भौतिक संपत्ती गोळा केली तरी त्याच्याकडे वैचारिक संपत्ती नसेल तर या सर्व संपत्तीचा काही उपयोग नाही.
आपल्या आजूबाजूला कल्पनाचे धुमारे आहेत ते शोधा म्हंजे जगणे अधिक सुंदर होईल.यशाची खरी व्याख्या समाधान हेच आहे.जगातले सगळ्यात मोठ यश म्हणजे आत्मिक समाधान होय.आपण जीवनात वेगळ काय करतो याला अत्यंत महत्व आहे.रोजच काहीतरी वेगळे करा.नेमकं नियोजन करून एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे होत नाही.परंतु नियोजन न करता केलेले कार्य उत्तम होत यात परमात्म्याची शक्ती नाही का…

 

Leave A Reply

Your email address will not be published.