महिला प्रवासीचे नवीन बसस्थानकाच्या आवारातून रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाच्या आवारात असलेल्या महिला प्रवासीच्या पर्स मधून ५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रोहिणी प्रदीप कुमावत (वय ३०, रा. तांबोळे बुद्रुक ता.चाळीसगाव) ह्या खाजगी कामानिमित्त जळगाव शहरात आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. २१ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात आल्या. दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपयांची रोकड लंबवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी सर्वत्र परिसरात शोध घेतला, परंतु पैश्यांचा कुठलाच सुगावा न लागल्याने अखेर त्यांनी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.