पारोळा येथे बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनचे लोकार्पण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलढाणा अर्बन को,ऑप, क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा या संस्थेच्या स्वमालकीचे पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी गोडाऊन बांधण्यात आले आहे गोडाऊनचे पारोळा एरंडोलचे आ. चिमणराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले . याप्रसंगी माजी पालक मंत्री डॉ,सतिश पाटील, नगराध्यक्ष करण पाटील,धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष कासट म्हसवे सरपंच सौ,ज्योती संदानशिव, स्थानिक सल्लागार बाळासाहेब पाटील,विधीतज्ञ तुषार पाटील, डॉ, अजित नांदेडकर, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, डॉ मिलिंद श्राफ, रावसाहेब भोसले, नितिन भोपळे, डॉ ईशांत जैन, विभागीय व्यवस्थापक रमेश पवार, पारोळा शाखा व्यवस्थापक कैलास कुंभेकर,आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बॅंकेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ,सुकेश झंवर यांनी संस्थेबाबत बोलताना सांगितले की आज पर्यंत संस्थेच्या ठेवी १०६०० कोटी आहेत तर कर्ज वाटप ८२०० कोटी रुपये आहे एकुण शाखा ४५५ असून या संस्थेना मधुन ७५०० कर्मचारी सेवा देत आहेत संस्था स्थापना पासून ऑडिट वर्ग हा ‘अ’ आहे संस्थेचे स्वमालकीचे शितगृह आहेत, तसेच संस्थांच्या वतीने अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात त्यांच्याच संस्थेच्यावतीने तिरूपती बालाजी येथे भक्तांनिवास तसेच पुणे व बुलढाणा येथे सभासदांच्या पाल्यांना वसतीगृहे महाराष्ट्र भर १२ रूग्णवाहिका २४ तास सेवा कार्य करीत आहेत .

न नफा ना तोटा या तत्वावर ह्या रूग्णवाहिका कार्यरत आहेत, तसेच ४५५ वेअर हाऊस शेतकरी व व्यापार्यांचा माल ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत, ग्रामीण भागात अल्पदरात वाटर ए टी एम तसेच वृध्द व अपंगांसाठी वातानुकूलित वृध्दाश्रम या सारखे अनेक उपक्रम ह्या संस्थेच्या वतीने राबविले जातात अशी माहिती संस्थेचे चिप मॅनेजिंग डायरेक्टर डॉ, सुकेशजी झंवर यांनी दिली,

Leave A Reply

Your email address will not be published.