अनोळखी व्यक्तीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७ वाजेच्या पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ असलेल्या रेल्वे लाईनवर एक अज्ञात व्यक्तीचा कोणत्या तरी धावत्या रेल्वे खाली येऊन मृत झाल्याचे समजते.

सदर व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर मृत अवस्थेत आढळला. ऑन ड्युटी विनय सिन्हा रे.पो दूरक्षेत्र जळगाव यांनी दिलेल्या लिखित माहितीनुसार रे. पो. दूरक्षेत्र जळगाव येथे आरी नं 33/ 22 कलम 174 सी.आर.पी.सी प्रमाणे मृत्यूची नोंद करण्यात आली.

सदर व्यक्तीचे वय अंदाजे 55 ते 60 वर्ष, शरीर बांधा साधारण, उंची 173 सें.मी, चेहरा व शरीर विद्रूप अवस्थेत असून डोळे बंद, नाक सरळ, रंग काळा-सावळा,  नेहरू मळकट शर्ट, पांढरा मळकट रंगाच्या पैजामा, कपडे फाटलेले अवस्थेत आढळले. सदर व्यक्तीचे ओळख पटवण्याचे आव्हान लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.